अंबाजोगाई
पाटोदा ममदापुर येथे शाळा सुरू करण्यासाठी नागरिकांचे धरणे आंदोलन

अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करावेत या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथील नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या समोर शुक्रवारी ( दि. ११) धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे की बीड जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यात पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु केवळ बीड जिल्ह्यात आठ ते बारा वर्ग सुरू झाले आहेत. जिल्ह्यामध्ये बाजारा सह इतर व्यवसाय सुरू आहेत. याठिकाणी कोरोना नाही काय असा सवालही आंदोलनकर्त्यांनी केला आहे?. पहिली ते सातवीचे वर्ग बंद असल्याने नवीन पिढी बरबाद होत आहे, यामुळे तात्काळ हे वर्ग चालू करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.