अंबाजोगाई

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टरांचे विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन

अंबाजोगाई:- मुंबई येथील जे.जे रुग्णालयाच्या समोर निवासी प्राध्यापक डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन चालू आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने आंदोलकांशी चर्चा न करता अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा निषेधार्थ अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयातील निवासी प्राध्यापक डॉक्टरांनी शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन केले.

प्रशाससानास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ यांच्यात गुरुवारी मंत्रालयात जोरदार खडाजंगी उडाली होती. याच्या निषेधार्थ आज स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टर प्राध्यापक कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे डॉ. सचिन मुळकूटकर यांच्या नेतृत्वाखाली अस्थायी डॉक्टरांचे शिष्टमंडळ विभागाचे सचिव सौरभ विजय यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पोहोचले. मात्र, भेटीची वेळ देऊनही ऐनवेळी ताटकळत ठेवण्यात आले आणि भेट नाकारली. किमान निवेदन स्वीकारण्याचे आणि नीट बोलण्याचे सौजन्य दाखवावे. डॉक्टरांशी असे वर्तन खपवून घेणार नसल्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली. यावेळी निलंबित करण्याच्या सौरभ विजय यांच्या वक्तव्यावर आक्रमक झालेल्या डॉक्टरांनी सर्वांना निलंबित करावे लागेलं अशी भूमिका घेत त्या आधी आम्ही सगळेच राजीनामा देतो असा पवित्रा देखील डॉक्टरांनी घेतला. सचिवांनी संघटनेच्या सदस्यांना अपमानित करून अशासकीय भाषेचा वापर केला, तसेच कोरोना योद्धा म्हणून शासनाने गौरव केलेल्या डॉक्टरांना बडतर्फ करण्याची धमकी दिली. या वागणुकीचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे संघटनेने म्हटले. अंबाजोगाई येथील आंदोलनात वैद्यकीय शिक्षक संघटनेचे डॉ.विश्वजित पवार, डॉ. राजेंद्र अंकुशे, डॉ दिपक कावळे, डॉ.लामतुरे, डॉ. देवानंद पवार, डॉ. प्रसाद सुळे, प्रवीण गोवंदे, नामदेव जुने, गणेश सुरवसे, राहुल झिने, सुनील स्वामी, निलेकर एस आर, मंगल चौरे, अपर्णा कुलकर्णी, राजश्री ढवळे, सीमा मोहिते, स्वाती चौधरी, गणेश खंदारकर, बिशेष मिहिकचुरे, दीपाली देव, व्ही.एल.वेदपाठक, विनय नाळपे, सतिशकुमार पोरवाल, पी.एम.हिप्परगेकर, मांगरेकर, ज्योती डावळे, शिवकांता मुंडे, वृषाली राजगिरे, दीपाली कुलकर्णी यांच्यासह अनेक शिक्षक डॉक्टरांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी असलेले निवेदन प्रशासनाला दिले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!