बॉलिवुड गॉसिप
जेष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन

मुंबई: बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेते अनुपम श्याम (Veteran actor Anupam Shyam passes away ) यांचं दि. ९ रोजी निधन झालं आहे. ते 63 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अनुपम श्याम यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांनी ‘मन की आवाज, प्रतिज्ञा’ या शोमध्ये ठाकूर सज्जन सिंगच्या भूमिका निभावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाशी संबंधित आजार उद्भवला होता