केजक्राईम डायरी

आपेगाव येथे उसाच्या शेतात मानवी सांगाडा आढळला

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपेगाव ता. अंबाजोगाई येथे एका उसाच्या शेतात मानवी हाडांचा सांगाडा आढळला आहे. सदर सांगाडा हा सोनिजवळा येथून बेपत्ता झालेल्या एका ८७ वर्षीय असल्याचा अंदाज आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १२ मार्च रोजी युसूफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील आपेगाव शिवारात उसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना एक मानवी हाडांचा सांगाडा दृष्टीस पडला. त्यांनी ही माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना कळविले. त्या नंतर पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली व तपास केला असता तो सांगाडा हा सोनीजवळा येथील शेतात मानवी हाडांचा सांगाडा सापडला आहे. त्याची ओळख पटविण्याचा नातेवाईकांना बोलावून तपास केला असता त्याच्या कपड्या वरून तो सांगाडा हा बंकट दाजी पवार याचा असल्याचे निष्पन्न झाले.

बंकट दाजी पवार हा २७ जानेवारी रोजी सोनिजवळा येथून बेपत्ता झाला होता. त्या बाबत दि. ३१ जानेवारी रोजी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात त्याची मिसिंग दाखल केली होती. त्याचा तपास पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे करीत होते. दरम्यान या आकस्माक मृत्यू प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात वैद्यकीय अहवाला नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येणार आहे अशी माहीती युसूफवडगाव पोलिसा कडून मिळाली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!