केजक्राईम डायरी

मोटारसायकलच्या अपघातात सैनीक ठार

केज /प्रतिनिधी:

सुट्टीवर गावाकडे आलेल्या सैनिकाच्या मोटारसायकल समोर हरीण आल्याने झालेल्या अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली आहे. केज तालुक्यातील दहिफळ (वड.) येथील आसाराम (अशोक) विष्णू ठोंबरे (26) हे आसाम येथे भारतीय सैन्यात कर्तव्यावर होते. परंतु मागच्या आठ दिवसांपूर्वी ते गावाकडे सुट्टीवर आले होते. परंतु दिनांक 23 रोजी ते दुपारी केजहून गावाकडे मोटारसायकल वर जात असताना केज बीड रोड वरील कदमवाडी – उमरी फाट्यादरम्यान एक हरीण आडवे आल्याने अपघात झाला व त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना बीड येथील एका खाजगी दवाखान्यात भरती करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या होत्या. व त्यांची प्रकृती सुधारत होती. दरम्यान त्यांना पुढील उपचारासाठी शनिवारी पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. परंतु दि.27 रोजी पहाटे त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. आसाराम हे तीन वर्षांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते व दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी व एक सात आठ महिन्यांचा मुलगा आहे. त्यांच्यावर सोमवारी दि.28 रोजी दहिफळ ह्या त्यांच्या मूळगावी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!