परळी
दगडफेक करणाऱ्या गावगुंडांना अटक करण्याची भाजयुमोची मागणी
परळी/प्रतिनिधी:
परळी शहरातील विविध भागांत शनिवार १२ रोजी मध्यरात्री काही गावगुंडांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करून दहशत पसरवली असुन या घटनेस दोन दिवस उलटले तरी पोलिसांकडून अद्याप कुणालाही अटक केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असुन या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करुन कडक शासन करावे अशी मागणी भाजयुमोच्या वतिने पोलिस उपाधिक्षक यांच्याकडे केली आहे. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा परळीचे ॲड.अरुण पाठक,नितीन समशेट्टी, नरेश पिंपळे, अनिश अग्रवाल, पवन मोदानी,योगेश पांडकर, अश्विन मोगरकर, प्रल्हाद सुरवसे,गोविंद चौरे, वैजनाथ रेकने, दिलीप नेहरकर, श्रीपाद शिंदे, शाम गित्ते आदी उपस्थित होते.