गेवराई
मुलीची आत्महत्या, दोषींना अटक करण्याची मागणी

गेवराई/प्रतिनिधी:
तालुक्यातील कोळगाव येथील शितल मदनने या मुलीने दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणी तीन जणांविरोधात चकलांबा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस कारवाई करत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोलिस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणातील दोषी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली गेली. अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष ओबीसी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष निजाम पठाण, नंदकुमार झाडे, राजेंद्र क्षीरसागर, समीर पठाण पीडित मुलीचे वडील सोमनाथ मदने व सर्व प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.