केज

आरपीआयचा ढाण्या वाघ दिपकभाऊ कांबळे

गौतम बचुटे/केज :- अन्याय अत्याचाराच्या विरोधात समर्थपणे उभा राहणारा; पुरोगामी विचारांचा आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले व युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिलेली जबाबदारी पेलणार रिपाइंचा केज तालुक्यातील झंझावात पँथर दिपकभाऊ कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

दीपक भाऊ कांबळे हे एका सामान्य आणि लव्हूरी सारख्या छोटया गावात जन्म घेतला; परंतु महाविद्यालयात शिकत असल्या पासून ते ना. रामदास आठवले आणि पप्पू कागदे यांच्या विचाराने प्रभावीत झाले. त्यांचे संघटन कौशल्य पाहून पप्पू कागदे यांनी दीपक कांबळे यांच्यावर युवा रिपाइं आणि नंतर मागील पाच वर्षां पासून केज तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकली. दीपक कांबळे हे अहोरात्र पक्षाच्या माध्यमातून दिन दलित, उपेक्षित अन्यायग्रस्त लोकांची सेवा करीत आहेत.
मा. पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा दलित ऐक्य दणका मोर्चात दिपक कांबळे आणि त्यांचे सहकारी यांनी रात्र अन् दिवस संपूर्ण केज तालुक्यातील वाडी, वस्ती, तांड्यावर फिरून बैठका घेतल्या. उपाशी राहून तर कधी वस्तीवर लोकां सोबत अक्षरशः मीठ भाकरी खाल्ली आणि केज तालुक्यातून हजारोंच्या संख्येने लोक मोर्चात सहभागी झाले.
कोरोनाच्या महामारीत दिपक कांबळे यांनी कष्टकरी, निराधार आणि विधवा अनाथ लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची उपासमार सुरू असताना त्यांना पाहवत नव्हती. मग त्यांनी आशा कुटुंबासाठी स्वतः कर्जबाजारी होऊन त्यांना किराणा सामान आणि रेशनचे वाटप केले. तसेच केज तालुक्यातील गायरानधारक आणि दलितांच्या स्मशान भूमीचा प्रश कायमचा सुटला पाहिजे म्हणून आंदोलने केली आणि प्रसंगी प्रशासना बरोबर ते व त्यांची टीम संघर्ष करीत आहे.
लव्हुरी येथील गायरानधारकावर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे अन्याय होत असल्याने दिपक कांबळे यानी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्महन करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या अंगावर इंधन ओतून घेत ते नखशिखांत भिजले होते. परंतु त्यावेळी पोलिसांनी चपळाईने त्यांच्या हातातील आगपेटी हिसकावून ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. एवढे ते निर्भीड असून समाजासाठी आणि अन्यायाच्या विरुद्ध लढत आहेत. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड असून प्रसंगी ते स्वतःच्या जिवाची देखील पर्वा करीत नाहीत.
दलित चळवळीत काम करण्या बरोबरच त्यांनी स्वतःचे एक राजकीय अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ. सौ सुजाता कांबळे या लव्हुरीच्या उपसरपंच आहेत त्या माध्यमातून दिपक कांबळे यांनी दुष्काळी परिस्थिती मध्ये परिसरातील पशुधन वाचविण्यासाठी त्यानी गुरांसाठी छावणी उघडली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी मुक्या जनावरांची देखील सेवा केली आहे तसेच त्यांच्या गावात सुसज्ज असे बौद्ध विहार बांधून त्यात शांतिदुत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबडेकर यांची अत्यंत मनमोहक मूर्ती बसवून त्या ठिकाणी अभ्यासिका निर्माण केली आहे. त्याचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत असून त्यातून उद्या अधिकारी घडू शकतात. दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच सुजाताताई कांबळे यांनी संपूर्ण दलित वस्तीत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवून रस्त्यावर विद्युतीकरण केले आहे. तसेच सर्वसुविधा युक्त अशी स्मशाभूमी बनविली आहे.
अशा या संघर्षाशील नेतृत्व समाजाने जपायला हवे आणि त्यांना बळ मिळायला हवे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!