केजक्राईम डायरी

केज तहसील कार्यालयात सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कोयत्याने खुनी हल्ला

तहसीलदार आशा वाघ यांची प्रकृती गंभीर : आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गौतम बचुटे/केज :- केज तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावाने कोयत्याने मानेवर व डोक्यात वार केले असून जखमी नायब तहसीलदार आशा वाघ यांची प्रकृती गंभीर आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, दि.६ जून २०२२ सोमवार रोजी सकाळी ११:३० वा. केज येथे महसूल विभागाच्या कार्यरत नायब तहसीलदार आशा वाघ यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ यांचे आपसात शेतीच्या कारणा वरून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यात आज दि. ६ जून सोमवार रोजी सकाळी ११:३० वा. मधुकर वाघ वय ४५ वर्ष रा. दोनडिगर ता. चाळीसगाव जि. जळगाव येथून येऊन केज तहसिल कार्यालयात त्या अस्थाना विभागात काम करीत बसलेल्या असताना मधुकर वाघ याने अचानक तेथे जाऊन त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने आशा वाघ या घाबरल्या आणि त्यांनी जीव वाचविण्यासाठी शेजारी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात पळाल्या. तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी हल्लेखोर भावाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. दरम्यान आशा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंबाजोगाई येथे हलविले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!