बीड

बीड येथे अजित पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

बीड/प्रतिनिधी:
कोरोना काळामध्ये रुग्णालयात काम करणाऱ्या कोव्हिड कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नौकरीत घ्या या मागणीसाठी शेकडो आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ( दि.१८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.

कोरोना काळामध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी नौकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी शुक्रवारी शेकडो कंत्राटी आरोग्य कर्मचारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले होते. यामध्ये महिलांचे कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश होता. या कर्मचाऱ्यांच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळास अजित पवार यांची भेट घेण्यास परवानगी देण्यात आली. त्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले. मात्र बैठकीनंतर आम्हाला भेटू द्या असा हट्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतला आणि अजित पवार यांचा ताफा आढवण्यासाठी काही महिला कर्मचारी यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. मुख्यमंत्री बैठक संपन्न जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निघाले तेव्हा काही कर्मचाऱ्यांना भेटीसाठी ताफा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या कर्मचाऱ्यांना दुर करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!