अंबाजोगाईक्राईम डायरी

जावयाला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

तिघांवर गुन्हा दाखल


अंबाजोगाईतील/ प्रतिनिधी:
पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरवाडीला आलेल्या जावयाला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न गेल्याची घटना शहरातील रविवार पेठ येथे शनिवारी (दि. 19 ) घडली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

केज येथील बीएसएनएल कार्यालया मागे राहणारे जयराम हनुमंत गिरी (वय 35) यांची अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ ही सासरवाडी आहे. त्यांची पत्नी पूजा यांच्याशी खटके उडाल्याने त्या माहेरी आल्या होत्या. आपल्या पत्नीला घेण्यासाठी जयराम गिरी हे सासरवाडीत आले होते. यावेळी “तू इथे का आला, आम्ही पूजाला तुझ्याकडे पाठवणार नाहीत” असे म्हणत तीघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांचे दोन्ही हात घट्ट पकडून बळजबरीने विषारी औषध तोंडात ओतले. जयराम गीरी हे उपचार घेऊन बरे झाले. त्यांच्या जवाबावरून आप्पा माणिक गिरी, माणिक गिरी व अलका गिरी यांच्यावर शहर पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!