केज

धारूर पोलीस त्याचे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे रुजू

गौतम बचुटे/केज :-  धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून युसूफ वडगाव येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी पदभार स्विकारला आहे.

या बाबतची माहिती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे हे मागील दोन वर्षा पासून केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे कार्यरत होते. युसूफवडगाव येथे कार्यरत असताना त्यांनी विविध गंभीर स्वरूपातील गुन्हे उघडकीस आणले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे हे अत्यंत मेहनती आणि कर्मचारी व लोकांत मिसळून काम करणारे अभ्यासू अधिकारी आहेत. त्यांना धारूर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याचा पदभार मिळाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!