पंकज कुमावत यांची औरंगाबाद जिल्ह्यात चढाई; चार ठिकाणी अवैद्य धंद्यावर धाड
सव्वा सात लाखाचा मुद्देमाल ताब्यात

गौतम बचुटे/केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील अवैद्य दारू विक्री, जुगार, मटका आणि गुटक्यावर कार्यवाही करून सुमारे सव्वासात लाख रु. पेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १६ एप्रिल रोजी औरंगाबाद परिक्षेत्राचे विभागीय पोलीस आयुक्त प्रसन्ना यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संतोष भालेराव, महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी, पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस नाईक बालाजी दराडे, विकास चोपने, राजू वंजारे, महादेव सातपुते, सचिन अंहकारे, रामहरी भंडाणे, अनिल मंदे, महादेव बहिरवाळ, संजय टुले यांच्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील विहामांडवा ता. पैठण येथील ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये प्रकाश रोडगे व अरुण फटांगडे हे ऑन लाईन राजश्री लॉटरीवर धाड टाकली यात ५० हजार ४५० रु. चे साहित्य ताब्यात घेतले. तसेच राहुल बिअर बारच्या शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये राहुल नागवे हा देशी व विदेशी दारू विक्री करीत असल्याने त्याच्याकडे ३१ हजार ४०६ रु. किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पाचोड येथे कृष्णा अंकुश नारळे, इरफान आलम पठाण, अनील भाऊसाहेब भोजने आणि दोन अल्पवयीन मुले अशा पाच जणांच्या कडून ६ लाख ४० हजार ६३५ रु. चा आरोग्यास हानिकारक व राज्यात विक्रीस बंदी असलेला तंबाखूजन्य गुटखा ताब्यात घेतला. तर विहामांडवा रोडवर मैहमुद बाबामिया तांबोळी, अश्पाक अजीज शेख, शब्बीर भाई आणि शहागड येथील व्यापारी नफीज शेख यांच्याकडून ११ हजार ७५४ रु. चा गुटखा ताब्यात घेतला.
औरंगाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आणि त्यांच्या पथकाने घातलेल्या अवैद्य धंद्यावरील धाडीत एकूण ७ लाख ३४ हजार २४५ रु. चा मुद्देमाल ताब्यात घेत पोलीस नाईक विकास चोपणे, बालाजी दराडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक महादेव सातपुते यांच्या फिर्यादी वरून अनुक्रमे गु. र. नं. १०५/२०२२ महाराष्ट्र जुगार कायदा १२(अ), गु. र. नं. १०६/२०२२ मुंबई दारुबंदी कायदा ६५(ई), गु. र. नं. १०७/२०२२ भा.दं.वि. ३२८, २७२, २७३ आणि गु. र. नं. १०७/२०२२ भा. दं. वि. ३२८, २७२, २७३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कार्यवाईमुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या बीड पोलीसांच्या मराठवाड्यातील अवैद्यवाल्यांवर दरारा निर्माण झाला आहे.