केज

डॉ. हनुमंत सौदागर, गौतम बचुटे आणि मनिषाताई घुले यांचा लव्हुरी येथे सन्मान

गौतम बचुटे/केज :-  विविध क्षेत्रात भरीव काम करून समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील डॉ. हनुमंत सौदागर, गौतम बचुटे आणि मनिषाताई घुले यांचा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रिपाइंचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात येणार आहे.

प्रा. हनुमंत सौदागर यांनी पाणी फाउंडेशनच्या माद्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी स्वतः कुटुंबासह झोकून देत काम केले आहे. ते उत्कृष्ट चारोळीकार आहेत. तसेच त्यांनी पत्नीसह देहदानाचा संकल्प केलेला आहे. मनीषाताई घुले या सामाजिक क्षेत्रात आणि महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचा आर्थिकस्तर उंचावून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी बीड जिल्ह्यात अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्य पुरविले आहे तसेच परप्रांतीय मजूरांना अन्नधान्य पुरवून भरीव काम केलेले आहे. पत्रकार गौतम बचुटे सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात भरीव कार्य असून अपघातग्रस्त, अन्याय अत्याचार पीडित विधवा निराधारांसाठी त्यांनी विविध उपक्रमांच्या माद्यमातून सेवा करीत आहेत तसेच पत्रकारीता क्षेत्रात निर्भीडपणे काम करीत असून तालुक्यातील एक धडाडीचे अग्रेसर पत्रकार म्हणून नावलौकिक आहे.
या तिघांच्या कार्याची दखल युवारिपाइंचे  प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मारदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांनी घेतली आहे. विश्ववंदनिय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ जयंती निमित्त दि. २९ एप्रिल रोजी लव्हुरी ता केज येथे मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कार बद्दल  प्रा हनुमंत सौदागर, गौतम बचुटे आणि मनिषाताई घुले यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!