अंबाजोगाई

घाटनांदूर येथील बस स्थानकाची प्रचंड दुरावस्था, प्रवाशांची गैरसोय

घाटनांदूर/प्रतिनिधी:
अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या घाटनांदूर येथील बस स्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून हे बसस्थानक असून अडचण नसून खोळंबा झाले आहे.

घाटनांदूर येथे परिसरातील तीस ते चाळीस गावाचा दैनंदिन व्यवहार जोडला असल्याने नेहमी वर्दळ असते. येथे शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक व युवती बरोबरच इतर आवश्यक वस्तू खरेदी साठी मोठी गर्दी असते. तसेच बीड जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील एकमेव रेल्वे स्थानक येथे असून रेल्वे प्रवाशांची मोठी वर्दळ असते, मात्र या प्रवाशाना जाणे – येणे करण्यासाठी बस ची व्यवस्था आहे. मात्र या प्रवाशाना मूलभूत सुविधा नसलेले बस स्थानक येथे असून बसण्याची व्यवस्था नाही. पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह , विद्युत व्यवस्था नाही. रात्री अंधाराचे सामराज्य असल्याने भीतीचे वातावरण असते. याठिकाणी गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात असून मद्यपी चा ठिकाणा असतो. बस स्थानकात बस कधी तरी येते यामुळे प्रवाशांना रस्त्यावर बस ची वाट पहात ताटकळत उभे राहावे लागत आहे. परळी विधानसभा मतदार संघातील निर्णायक राजकीय केंद्र असलेल्या घाटनांदूर येथे त्वरित बसस्थानकाची उभारणी करण्याची मागणी प्रवाशी विद्यार्थी व नागरिक करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!