अंबाजोगाई

प्रा. दिलीप बडे यांचे -हदयविकाराने निधन

अंबजोगाई: येथील भुमीपुत्र तथा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ चित्रकार व औरंगाबद येथील शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता प्रा. दिलीप बडे (वय: 70) यांचे रवीवारी (दि. 6) पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास -हदयविकाराने निधन झाले.

प्रा. दिलीप बडे यांच्या छातीत रवीवारी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास दुखू लागल्याने ते पायी चालत दवाखान्यात गेले, त्या ठिाकणी डॉक्टर तपासत असतांना -हदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. मुळ अंबाजोगाई येथील बोधीघाट चे रहीवासी असणारे प्रा. दिलीप बडे हे औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या समोर असलेल्या नंदनवण वसाहतीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परीवार आहे. रवीवारी दुपारी औरंगाबाद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!