क्राईम डायरीमाजलगाव

दिंद्रुड येथील ॲट्रॉसिटी प्रकरणात अटकपूर्व जामीन

दिंद्रुड/प्रतिनिधी:

येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालय माजलगाव यांनी बुधवारी (ता.१६ मे) अटकपूर्व जामीन मंजूर केला. ४ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास विकास काटकर याने फिर्यादी नामे नारायण विश्वनाथ चांदबोधले यांना जातीवाचक शिवीगाळ करून कोयत्याने जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत चांदबोधले यांच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता. आरोपीच्या वतीने अॅड.व्ही. बी. लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड .प्रमोद ठोंबरे यांनी जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय माजलगाव येथे दाखल केला होता. त्यानुसार बुधवारी विकास काटकर यास अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!