अंबाजोगाई

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी झुम मिटींगद्वारे घेतला बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा

बीड जिल्हा काँग्रेसच्या मागणीला यश-जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदींची माहिती

अंबाजोगाई/प्रतिनिधी
कोरोनाविरूद्धच्या लढ्यात बीड जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा यशस्विपणे काम करीत असून
अंमलबजावणीच्या पातळीवर कृतिशील कार्यवाही होत आहे. काँग्रेस पक्षाकडून सातत्याने लोकांच्या हिताच्या बाबींसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी झुम मिटींगद्वारे बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा नुकताच आढावा घेतला.या प्रसंगी बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला यश आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे महसुल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच बीड जिल्हा काँग्रेसची झुम मिटींग घेऊन तालुकानिहाय आढावा घेतला.या मिटींगमध्ये काँग्रेसचे जिल्हाप्रभारी प्रा.सत्संग मुंडे,बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके यांचेसह पक्षाच्या सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष, पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते असे एकूण ५५ पेक्षा अधिक जिल्हा पदाधिकारी ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या आढावा बैठकीतील चर्चेत मार्गदर्शन करताना ना.थोरात म्हणाले की,बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने अतिशय उत्तम काम केले आहे. कोविड पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने लोकहितासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे.कोविड प्रतिबंधक लस उपलब्धता व लसीकरण,स्वॅब अहवाल,स्वॅब दिलेल्या रूग्णांचे विलगीकरण,रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीट उपलब्धता,रूग्ण संख्येत घट की,वाढ, वस्तुस्थिती,आवश्यक औषधे,शासकीय रूग्णालये किंवा कोविड केअर सेंटर मध्ये उपलब्ध सेवा-सुविधा,ऑक्सिजन,आवश्यक इंजेक्शन,उपचार तसेच बीड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शासकीय कोविड केअर सेंटरची माहिती त्यांनी घेतली.त्यानंतर त्यांनी आपली निरीक्षणे नोंदवताना जनतेचे प्रश्न सोडविताना राज्यातील सत्तेचा उपयोग करा, महाविकास आघाडी सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय जनतेसमोर ठेवा,या सोबतच केंद्रातील भाजप सरकारने जे जनविरोधी,चुकीचे निर्णय घेतले ते निर्णय त्यांनी मागे घ्यावेत यासाठी प्रभावीपणे काम करा,काँग्रेस पक्षाची ताकद आणखीन वाढविण्यासाठी सर्व सेलच्या पदाधिका-यांच्या निवडी करून संघटनात्मक पातळीवर बांधणी करा,यापुढे ही सामान्य जनतेत जावून काम करा,सर्व शासकीय समित्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी द्यावी असे ना.थोरात यांनी सांगितले.तर मंञी महोदयांशी बोलताना काँग्रेसचे जिल्हाप्रभारी प्रा.सत्संग मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या विधायक उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगून कोविड काळात केलेल्या कार्याची माहिती दिली.तर जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी कोविड पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांत काँग्रेस पक्षाने गरजू कुटूंबिय यांना जीवनावश्यक व किराणा साहित्य वाटप,१ हजारहून अधिक कार्यकर्ते यांनी समर्पित भावनेतून केलेले रक्तदान, कोविड रूग्णांच्या नातेवाईकांना अन्नधान्य,भोजन वाटप,परप्रांतीय कामगार व मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले,वृक्षारोपण करण्यात आले असे सांगून मोदी यांनी बीड जिल्ह्याला काँग्रेस पक्षाचा संपर्कमंञी नाही तरी आपण संपर्कमंञी म्हणून आपण यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुकाध्यक्ष महादेव धांडे (बीड) यांनी दर महिन्याला बीड जिल्ह्यात काँग्रेस मंत्र्यांनी दौरा करावा जेणेकरून जनतेची व कार्यकर्त्यांची कामे होतील आणि काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.तर या चर्चेत सहभाग होत ॲड.विष्णुपंत सोळंके यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये न्यायालयात जिल्हा व सहाय्यक सरकारी वकिलांची नेमणूक करावी या मागणीकडे लक्ष वेधले होते. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सन्माननिय मुख्यमंञी,उपमुख्यमंञी आणि मंञी मंडळ याबाबत योग्य निर्णय घेईल असे ना.थोरात यांनी नुसते सांगितलेच नाही तर याप्रश्नी मंत्रिमंडळाने निर्णय जाहीर केला त्यानुसार आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये न्यायालयात जिल्हा व सहाय्यक सरकारी वकिलांची नेमणूक होणार आहे.राज्यातील दुय्यम न्यायालय आणि मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे जिल्हा सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.बैठकीच्या
अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते.यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि मुंबईतील नगर दिवाणी न्यायालय आणि लघुवाद न्यायालय येथे शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील आणि अतिरिक्त अथवा सहायक सरकारी वकील यांच्या नियुक्ती करण्यात येणार आहेत.या नियुक्त्या महाराष्ट्र विधि अधिकारी (नेमणूका, सेवाशर्ती आणि भत्ते) नियम,1984 मध्ये नमूद सेवा शर्तीच्या अधिन राहून करण्यास परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती देवून बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून करण्यात आलेल्या मागणीला यश मिळाल्याचे सांगून जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके यांनी महसुल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांचे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. या ऑनलाईन माध्यमातून आयोजित बैठकीत महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके,महिला काँग्रेस अध्यक्षा मिनाक्षीताई पांडुळे पाटील, नगराध्यक्षा सौ.रचनाताई सुरेश मोदी,नगरसेविका संगीताताई सुनिल व्यवहारे,सेवादल जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे,अनुसूचित जाती व जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष गोविंद साठे (बीड),रविंद्र ढोबळे (आष्टी),जिल्हा उपाध्यक्ष राहूल साळवे,गोविंद पोतंगले,तालुकाध्यक्ष महादेव धांडे (बीड), तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे (अंबाजोगाई), शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने(अंबाजोगाई),अशोक तिडके (धारूर), सुनिल नागरगोजे(शिरूर),भागवत गव्हाणे (धारूर), निंबाळकर (आष्टी), ॲड.कोल्हे (गेवराई), दत्ताञय कांबळे (माजलगाव),नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक सुनिल व्यवहारे, नगरसेवक धम्मपाल सरवदे,नगरसेवक वाजेद खतीब,राणा चव्हाण,सुनिल वाघाळकर,कचरूलाल सारडा,माणिक वडवणकर,सज्जन गाठाळ,गणेश मसने, अशोक देवकर,दिनेश घोडके,अकबर पठाण,विजय कोंबडे, सचिन जाधव,सुधाकर टेकाळे,जुनेद सिद्दीकी,प्रताप देवकर,अजीम जरगर, अमोल मिसाळ,आनंद टाकळकर,काझी शाकेरभाई,महेश वेदपाठक आदींसह काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातील विविध सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष,सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!