अंबाजोगाई

महाराष्ट्र ग्रामीण बँक व नाबार्ड च्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता अभियान मेळावा संपन्न

घाटनांदूर/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर पासून जवळच असलेल्या मौजे साळुंकवाडी येथे मंगळवारी ( दि.१) वित्तीय साक्षरता मेळावा संपन्न झाला आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक आर एम सोळंके यांनी विविध वित्तीय योजनांची माहिती दिली. सदरील योजने मध्ये जीवन ज्योती योजना जीवन सुरक्षा, अटल पेन्शन योजना, आरोग्य विमा या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपशाखा व्यवस्थापक तेजस पिसाळ, शेख सादिक, वैजनाथ नागरगोजे, सरपंच सौ विद्या सुधाकर माले, उपसरपंच संजीवनी आबासाहेब बेलदार, पोलिस पाटील इंद्रशेखर कर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय खंडापुरे, ग्राम सदस्य बालासाहेब कर्वे, चंद्रकला नवले यांच्या सह ग्रामस्थ उपस्तिथ होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!