अंबाजोगाईक्राईम डायरी
उभ्या ट्रॅक्टर ला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी

अंबाजोगाई: उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीने पाठमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना तालुक्यातील बर्दापूर ते सायगाव रस्त्यावर असलेल्या शेतकरी धाब्या समोर घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
गणपती हरिश्चंद्र बरिदे (57,रा.गव्हाण,ता.रेणापूर,जि.लातूर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार गणपती बरिदे यांचा डावा पाय मोडला तर गुडघ्याला दुखापत झाली. याप्रकरणी गणपती बरिदे यांच्या तक्रारीवरुन दि. 4 मार्च रोजी ट्रॅक्टर चालक शरद प्रभाकर पवार (रा.आसरडोह, ता.धारुर) याच्यावर बर्दापूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पुढील तपास पोलिस नाईक चेवले करीत आहेत.