क्राईम डायरीबीड
सलून व्यावसायिकास घरात घुसून मारहाण

बीड /प्रतिनिधी:
‘फोनवरून शिवीगाळ का केलीस’ अशी कुरापत काढून एका सलून( Barber beaten) व्यावसायिकास घरात घुसून मारहाण केल्याची घटना २६ रोजी शहरातील कबाडगल्लीत घडली. अशोक गणपत दोडके (३४) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
अशोक दोडके हे घरी असताना ओमकार अशोक जाधव (रा. एमआयडीसी, गांधीनगर, अहमदनगर), आरती गणपत दोडके (रा. कबाडगल्ली) व इतर दोन अनोळखी हे त्यांच्या घरात शिरले. ओमकार जाधव याने त्यांना ‘तू मला फोनवर शिवीगाळ का केली’ अशी कुरापत काढून मारहाण केली. यावेळी त्याचे आई-वडील सोडवासोडव करण्यास आले तेव्हा त्यांनाही मारहाण केली. याप्रकरणी चौघांवर शहर पोलिसांत गुन्हा नोंद केला. हवालदार विकास रेवाळे तपास करत आहेत.