केजक्राईम डायरी

चालत्या ट्रकमधून बॅटरी लंपास

केज /प्रतिनिधी: 

अज्ञात चोरट्यांनी चालत्या ट्रकमध्ये चढून १० हजार रुपयांची बॅटरी चोरून २० हजार रुपयांच्या दोन बॅटऱ्या फोडून नुकसान केल्याची घटना केज – मस्साजोग दरम्यान घडली. मुदगड ( ता. निलंगा, जि. लातूर) येथील ट्रकचालक कमलाकर रंगराव सुरवसे हे ऑटोमोटिव्ह बॅटऱ्या ट्रकमध्ये भरून डिलिव्हरी करण्यासाठी घेऊन जात होते. १३ जून रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास केज-मांजरसुंबा रस्त्यावरील नियोजित टोल नाका ते दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चालत्या ट्रकवर चढून १० हजार ९४ रुपये किमतीची एक बॅटरी काढून घेत ट्रकमधील २० हजार १८८ रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या फोडून नुकसान केले. २५ जून रोजी ट्रकचालक कमलाकर सुरवसे यांनी दिलेल्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार दिनकर पुरी पुढील तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!