अंबाजोगाईक्राईम डायरी

बांधाला म्हैस चारल्याने एकास मारहाण

अंबाजोगाई/ प्रतिनिधी:
शेतातीच्या बांधाला म्हैस का चारली ( beaten for buffalo grazing farm bandh) अशी कुरापत काढून एकास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पिंपरी येथे शनिवारी ( दि. २७) घडली. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात तीघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश रमेश कातकडे यांना म्हैस बांधावर का चारली अशी भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गणेश रमेश कातकडे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानोबा मारुती फड, अनंत बबू फड व विष्णू ज्ञानोबा फड ( सर्व रा. पिंपरी ता. अंबाजोगाई) यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुरनं 76/2021 कलम 324, 323 504, 506 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार केंद्रे करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!