क्राईम डायरीगेवराई
बेलगावात एकाला दगडाने मारहाण

गेवराई / प्रतिनिधी:
पैशाच्या व्यवहारातून एकास दगडाने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बेलगाव येथे १५ जून रोजी घडली. यावरुन तिघांवर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सर्जेराव राजाराम गव्हाणे (रा.बेलगाव ता . गेवराई) असे जखमीचे नाव आहे.
पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून त्यांना अंबादास गव्हाणे याने दगड मारुन हात फ्रॅक्चर केला. कुंडलिक गव्हाणे याने काठीने मारहाण केली. दत्ता गव्हाणे याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. गेवराई पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.