कंडक्टर जावयास सासरवाडीत बेदम मारहाण!

गौतम बचुटे/केज :- बहिणीला शिवीगाळ करीत असल्याच्या कारणा वरून सासरवाडीच्या नातेवाईक आणि स्वतःच्या पत्नीने देखील पतीस डोक्यात दगडाने मारहाण करून डोके फोडले घडल्याची घटना तालुक्यातील सांगवी (सारणी) येथे घडली.
याबाबत माहिती अशी की. दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:०० वा. च्या दरम्यान महादेव धस यांना त्यांचे मेहुणे बबलू ढाकणे व योगेश ढाकणे दोघे रा. जोला ता. केज यांनी संगनमत करून बहिणीला शिवीगाळ करीत असल्याच्या कारणावरून भांडण केले. भांडणात योगेश ढाकणे याने महादेव धस याच्या डोक्यात दगड मारून जखमी केले आणि बबलू ढाकणे व महादेव याची पत्नी सौ. रागिणी महादेव धस या तिघांनी महादेव धस याना शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महादेव धस यांच्या फिर्यादी वरून त्यांचे मेव्हणे बबलू ढाकणे, योगेश ढाकणे व त्यांची बायको सौ. रागिणी महादेव धस यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५६/२०२२ भा.दं.वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.