अंबाजोगाईक्राईम डायरी

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

माकेगाव फाट्यावरील घटना

अंबाजोगाई:  भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील माकेगाव फाट्यावर घडली होती. याप्रकरणी ट्रॅक्टर चालका विरूद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाघाळा येथील बाळासाहेब ग्यानबा चव्हाण ( वय: ५०) हे आपल्या दुचाकी वरून लोखंडी सावरगाव कडून वाघाळा येथे जात होते. यावेळी माकेगाव फाट्याजवळ ट्रॅक्टर चालकाने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर ( एम एच ४४ एस ६१८३) हयगईने, भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून बाळासाहेब चव्हाण यांच्या मोटरसायकलीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी व्यंकट नारायण चव्हाण यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!