अंबाजोगाईक्राईम डायरी

हॉटेल समोर लावलेली शिक्षकाची दुचाकी चोरी

अंबाजोगाई: शहरातील एका बिर्याणी हॉटेल समोर लावलेली शिक्षकाची दुचाकी चोरी झाल्याची घटना दि. १३ रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

धारुर तालुक्यातील मेघा तांडा अंजनडोह येथील मूळ रहीवासी व हल्ली नेताजी कॉलनी अंबाजोगाई येथे राहणारे शिक्षक वसंत भाऊ राठोड ( वय: ५३) यांची होंडा कंपनीची सीबीशाईन दुचाकी ( एमएच ४४ व्हि. ९०२३) त्यांच्या मुलाने बस स्टँड च्या पाठीमागे असलेल्या एका बिर्याणीच्या हॉटेल समोर लावली होती. यावेळी चोरट्यांनी हँडल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली यामुळे त्यांचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शिक्षक वसंत राठोड यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहरकर करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!