अंबाजोगाईक्राईम डायरी

महाविद्यालयातून दुचाकी चोरी

घाटनांदुर/प्रतिनिधी:
येथील वसुंधरा महाविद्यालयातून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरी झाल्याची घटना सोमवारी ( दि. २१) दुपारी घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

साकुड येथील प्रवीण पंडित वेडे( वय: २६) हे आपल्या भावाला महाविद्यालय सोडण्यासाठी त्यांच्या दुचाकीवर ( एमएच २५ एस ६७४६) गेले होते. ते पार्किंग मध्ये दुचाकी लावून भावाला महाविद्यालय सोडण्यास गेले. परत आल्यानंतर पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी जाग्यावर दिसली नाही. या प्रकरणी प्रवीण वेडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस नाईक बिक्कड पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!