केज

उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी केली ऊसतोड मजुरांची सुटका

राज्य मंत्र्यांच्या पत्राने प्रशासनाची पळापळ !

गौतम बचुटे/केज :- ऊस तोड मुकादम ऊस तोड मजुरांना त्यांच्या गावी जाऊ देत नसल्याची माहिती राज्यमंत्री ना बच्चू कडू यांना महिती मिळताच त्यांनी थेट या प्रकरणी त्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्या मार्फत थेट कामगार आयुक्तांना या बाबत कार्यवाही करण्याचे सूचित करताच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, कामगार अधिकारी यांनी या ऊसतोड कामगारांना एका खाजगी वाहनांनी त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था केली.

या बाबतची माहिती अशी की, कामगार राज्य मंत्री ना बच्चू कडू यांना मा. आ. राजकुमार पटेल यांच्या कडून अशी माहिती मिळाली की, केज तालुक्यातील साळेगाव येथे अमरावती जिल्ह्यातील कावडाझिरी ता. धारणी येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या कामाचे वेतन दिले नसून त्यांना डांबून ठेवले आहे. या माहितीची ना. बच्चू कडू यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांच्याद्वारे दि. २९ मार्च रोजी कामगार उपायुक्त औरंगाबाद यांना सदर कामगाराचे वेतन व आवश्यक ती कायदेशीर मदत करुन त्यांना त्याच्या गावी पाठवण्या बाबत कळवून आवश्यकता भासल्यास पोलीसा मार्फत उचित कारवाई करावी. असे कळवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विनाविलंब अवगत करण्याचे सूचना केल्या होत्या.

दरम्यान ही माहिती मिळताच दि.३१ मार्च गुरुवार रोजी अंबाजोगाई उपविभागाचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके, जिल्हा कामगार अधिकारी एस. जी. मुंडे आणि तहसीलदार दुलाजी मेंडके या अधिकाऱ्यांनी सरपंच कैलास जाधव तलाठी इनामदार व पोलीस नाईक महादेव बहिरवाळ, उमाप यांना सोबत घेऊन साळेगाव येथील गित्ते यांच्या शेतात ऊस तोडणी करीत असलेल्या ऊसतोड कामगारांची भेट घेतली. परिस्थितीची पहाणी करून त्या ऊस तोड मजुरांना त्यांच्या गावी अमरावती जिल्ह्यात एका खाजगी वाहनाने पाठविले.

मजुरात ओली बाळंतणीचा समावेश :-

या ऊसतोड मजुरात अमरावती जिल्ह्यातील कावडाझीरी ता. धारणी येथील रंगीता, गंगुबाई, फुलवंती, निलेश, राकेश, राजा, मुंजीलाल, शंकर, मिना, रीना या मजुरांचा समावेश होता तर यांच्यात एक नवजात बाळाची आई ओली बाळंतीण होती.

 

मजुरांची सुटका मात्र मुकादमावर कारवाई नाही :

या प्रकरणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता मजुरांना त्रास नसल्याचे निदर्शनास आले म्हणून त्या ऊसतोड मुकादमावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याची माहिती मिळाली.

अचानक गाड्या अधिकारी पाहून गावकरी धास्तावले :-

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा कामगार अधिकारी आणि पोलीस यांच्या गाड्यांचा अचानक ताफा बघून काय घटना घडली अशी चर्चा झाली आणि गावकरी धास्तावले होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!