क्राईम डायरीमाजलगाव
मामाच्या गावी आलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

माजलगाव/प्रतिनिधी:
शाळेला सुट्या असल्याने मामाच्या गावी आलेल्या बारा वर्षीय मुलाचा धरणाच्या ( Boy drowned in dam) पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी (दि.२०) सकाळी आठ वाजता ही घटना घडली.
प्रेम संतोष पिंपरकर (१२, रा.साडेगाव ता जि.परभणी) असे मयताचे नाव आहे. शहराजवळील केसापुरी कॅम्प परिसरात राहत असलेल्या विश्वनाथ क्षीरसागर हे त्याचे मामा असून तो त्यांच्याकडे आला होता. कॅम्प परिसरातील सुजान उगले यांच्या शेतातील धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरला असता पाणी खोल असल्याने तो बुडाला.यात त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिसांत विश्वनाथ क्षीरसागर यांच्या खबरीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद झाली करण्यात आली.