क्राईम डायरीमाजलगाव
सासरवाडीत जावयाचा राडा

माजलगाव/प्रतिनिधी:
‘माझ्या पत्नीस तुम्ही घरात लपवून ठेवले’ अशी कुरापत काढत जावयाने सासरवाडीत राडा केला. सासरा व मेहुण्यास मारहाण करुन धमकावल्याची घटना शहरातील गौतमनगरात मंगळवारी ( ता . २१ ) घडली.
छबूराव रंगनाथ कांबळे (६०,रा.गौतमनगर) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, २१ रोजी जावई महादेव बाबू वाघमारे (रा. आझादनगर) हा मद्यप्राशन करुन घरी आला. त्याने’माझ्या पत्नीस तुम्ही घरात लपवून ठेवले’ अशी कुरापत काढून शिवीगाळ करत हातावर दगड मारला व मुलगा संभाजी यास मारहाण करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.