केजक्राईम डायरी
जोला येथे भाऊ-भावजयीस बेदम मारहाण

केज/प्रतिनिधी:
जागेत जाळी का मारली अशी भांडणाची कुरापत काढून सख्ख्या भाऊ व भावजयीस शिवीगाळ करीत दगड व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील जोला येथे घडली. याप्रकरणी एक जणाविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जोला येथील काकासाहेब सुंदर उगले यांनी माझ्या जागेत जाळी का मारली अशी भांडणाची कुरापत काढून रविवारी त्यांचा सख्खा भाऊ इंदर सुंदर उगले यांना दगडाने हातावर मारहाण करून दुखापत केली. तर जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद इंदर उगले यांनी दिल्यावरून काकासाहेब उगले यांच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला.