अंबाजोगाई
आ. नमीता मुंदडांनी केली स्वाराती रुग्णालयाच्या इमारतीचे पाहणी

अंबाजोगाई: येथील स्वाराती रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या नवीन इमारतीचे काम सुरु आहे. सुरु असलेल्या या बांधकामाची पाहणी सोमवारी (दि.१५) आ. नमीता मुंदडा यांनी अचानक भेट देऊन केली. बांधकामा बाबत पुर्वी सुचविलेले बदल केले की नाही याची पाहणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांच्या समवेत अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. आ. मुंदडा यांनी बारकाईने कामाची पाहणी करून सर्वांशी चर्चा केली आणि कामाबद्दल समाधान व्यक्त केले व उर्वरित कामाबद्दल सूचना केल्या. तसेच, वारंवार येऊन पाहणी करणार असून कुठल्याही कामात अनियमितता होता कामा नये अशी सक्त ताकीद आ. मुंदडा यांनी यावेळी दिली.