अंबाजोगाईकृषी

ममदापूर पाटोदा येथे चार एकर ऊस जळून खाक

शिवाजी जाचक/ ममदापुर:
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर पाटोदा येथे एका शेतकऱ्याचा चार एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि. ३१) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे आठ लाखांचे नुकसान झाले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर पाटोदा येथील शेतकरी गणेश दीपक जाधव यांचा गट नंबर ५२६ मध्ये असलेला चार एकर ऊसास सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल्याने चार एकर मधील तोडणी ला आलेला ऊस जळून खाक झाला. ऊस जळाल्याने शेतकरी गणेश जाधव यांचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान हा ऊस कशाने जळाला याचे कारण कळू शकले नाही.

        ऊस जळतानाचा व्हिडिओ

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!