
अंबाजोगाई: तालुक्यात ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या झोपड्या जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी ( दि. ८) दुपारी राडी येथे घडली. यामुळे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
राडी परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस तोड सुरू आहे. येथील शेतकरी रावण हरिश्चंद्र गंगणे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे. या तोडणीच्या कामासाठी ऊसतोड मजूर कापडी झोपड्या बांधून राहत आहेत. मंगळवारी दुपारी दोन मजुरांच्या झोपडीस अचानक आग लागून झोपडीतील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ऊसतोड मजूर राहुल राठोड, विक्रम राठोड यांचे साहित्य जळून खाक झाले त्यामुळे त्यांचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.