अंबाजोगाई
अंबाजोगाई आगारात पाच खाजगी चालक रूजू; एकूण १४ बस गाड्या सुरू

अंबाजोगाई: राज्यभर सुरू असलेल्या संपामुळे बससेवा कोलमडली आहे. कोलमडलेली बससेवा सुरळीत करण्यासाठी अंबाजोगाई आगारात प्रशासनाच्या वतीने ५ खाजगी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आगारातून आज घडीला १४ बसगाड्या सुरू झाल्या आहेत.
विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात येथील कर्मचारी सामील झाले आहेत. प्रशासनाच्या विनंतीनंतर आगारातील ९ चालक रुजू झाले आहेत तर प्रशासनाने ५ खाजगी चालकांची नियुक्ती केली आहे. यामुळे आगारातून १४ बस गड्या सुरू झाल्या आहेत. लातूर, बीड, परळी, औरंगाबाद अशा ठिकाणी या बसगाड्या रोज जात आहेत. आगारातून १४ बसगाड्या सुरू झाल्याने काही प्रमाणात का होईना प्रवाशांची सोय झाली आहे.