अंबाजोगाई

अंबाजोगाई आगारातून ४५ एसटी बसेस सुरू

अंबाजोगाई:  कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसगाड्या बंद होत्या. काही कर्मचारी रुजू झाल्याने येथील  बस आगारातून ४५ एसटी बसेस सुरू करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण करण्याची मागणी करीत संप पुकारला आहे.  शासनाने वेळोवेळी कामावर रुजू होण्यासाठी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंबाजोगाई आगारातील काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने अंबाजोगाई आगारच्या ४५ एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. यात पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, मेहकर यासह आदी गाड्यांचा सहभाग आहे. यामुळे अनेक दिवसापासून  प्रवाशांची होणारी गैरसोय थोड्याफार प्रमाणात थांबली  आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!