केजक्राईम डायरी

केज येथे मोटार सायकल व एसटी बसच्या अपघातात एक ठार एक जखमी

गौतम बचुटे/केज :- केज येथे केज-अंबाजोगाई रोडवर सोनीजवळा पाटी जवळ च्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ एसटी बस आणि मोटार सायकलीच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १४ जून मंगळवार रोजी रात्री ८:०० वा. च्या दरम्यान केज येथे केज-अंबाजोगाई रोडवर सोनिजवळा पाटी जवळील जलशुद्धीकरण केंद्रा जवळ लातूर कडून येणाऱ्या एका एसटी बस क्र. (एम एच-२०/बी एल-१९२४) आणि मोटार सायकलचा क्र. (एम एच-२५/ एस-१९२४)अपघात झाला. अपघातात मोटार सायकलवरील कळंब तालुक्यातील तेरखेडा येथील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. आघाटातील मयत व जखमींची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह महादेव बहिरवाळ, हनुमंत गायकवाड आणि गित्ते यांच्या पथकाने घटनास्थळी हजर होत अपघातातील जखमी आणि मयत याना उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!