क्राईम डायरीबीड
कापड व्यापाऱ्याची आत्महत्या

बीड/प्रतिनिधी:
तालुक्यातील चौसाळा येथे कापड व्यावसायिकाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.१५) पहाटे उघडकीस आली.
गिरीश गणेश शिंदे (३९, रा.चांदेगाव हमु.चौसाळा) असे मयताचे नाव आहे. चौसाळ्यात घराच्या तळमजल्यात ते कापडाचे दुकान चालवतात. सोमवारी रात्री शिंदे कुटुंबीय जेवण करुन झोपी गेले. मध्यरात्रीनंतर गिरीश यांनी वरच्या मजल्यावरील दरवाजाच्या कडीला दोरी व टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आई मंगळवारी पहाटे जाग्या झाल्या, तेव्हा गिरीश यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड केल्यावर कुटुंबीयांनी त्यांना फासावरुन खाली उतरवून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले;परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. चौसाळा चौकीचे हवालदार बाबासाहेब डोंगरे यांनी पंचनामा केला.