क्राईम डायरीधारुर
धारूर मध्ये व्यापाऱ्याची आत्महत्या

धारूर/ प्रतिनिधी:
येथील एका व्यापाऱ्याने आपल्या दुकानातच गळफास लावून आत्महत्या ( Business man suicide) केल्याची घटना बुधवारी ( दि. २३) उघडकीस आली. धनंजय शिरीष पिलाजी असे आत्महत्या केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. या आत्महत्या मागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
शहरातील मुख्य रस्त्यावर न्यू श्रीकांत जनरल व मोबाईल सेंटर या दुकानाचे मालक धनंजय शिरीष पिलाजी ( वय 38) यांनी बुधवारी आपल्या दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यावेळी नागरिकांनी त्यांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कारवाई करीत आहेत