युवा सेनाप्रमुख ठाकरेंकडून बीडसाठी ८ बाय-पॅप मशीन

बीड/ प्रतिनिधी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता त्याची पुर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बीड जिल्हा रूग्णालयासाठी ४ व लोखंडी सावरगाव येथील कोवीड सेंटरला ४ अशा एकूण ८ बाय-पॅप मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते या मशिन प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका व्यक्त केला जात असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या बायपॅप मशिन मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. गिते व लोखंडीसावरगाव येथील स्त्री रूग्णालयाच्या अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे यांच्याकडे हे उपकरणं सोपवण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक योगेश नवले, केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, अंबाजोगाई तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा सह संघटक अशोक गाढवे, उपशहरप्रमुख गणेश जाधव, शहर समन्वयक अर्जुन जाधव, युवा सेनेचे विनोद पोखरकर, अक्षय भूमकर, उपतालुकाप्रमुख वसंत माने, नागेश कुंभार, खंडू पालकर, हनुमंत हावळे, विशाल कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. कोरोना महामारीत शासनासह पक्ष म्हणूनही शिवसेना आपले दायित्व निभावत असल्याचे याप्रसंगी जिल्हाप्रमुख मुळूक यांनी सांगितले.