क्राईम डायरीबीड

तलवारीने सीसीटीव्ही कॅमेरे फोडले

बीड/प्रतिनिधी

शहरातील गुलजारपुरास्थित तकिया मशीदच्या अलीकडे असलेल्या एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची अज्ञाताने तलवारीने तोडफोड केली. ६ जून रोजी ही धटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे..
या घटनेबाबत संस्थेचे अध्यक्ष आय.एम.काजी यांनी शहर पोलीस निरीक्षकांसह पोलीस उपअधीक्षक आणि पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे कार्यालय लॉक डाऊन काळात गेल्या तीन महिन्यांपासून पूर्ण वेळ बंद ठेवण्यात आले होते. मात्र नुकतेच जिल्हा प्रशासनाच्या नवीन आदेशानुसार ७ जून पासून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लॉक डाऊन मध्ये शिथिलता देण्यात येऊन सर्व शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय आणि सर्व उद्योग व्यवसाय सुरू करण्याची मुभा देण्यात आली. यामुळे ७ जून रोजी सकाळी सोशल संस्थेचे कार्यालय उघडण्यासाठी ते आले असता त्यांना कार्यालयाबाहेर लावलेला सी.सी.टी.व्ही. कॅमेरा फुटलेल्या अवस्थेत दिसून आला. कार्यालय उघडून त्यांनी फुटेज बघितले असता अज्ञात इसम कॅमेरा फोडत असल्याचे दिसून आले. तोडफोड करणाऱ्या या इसमाच्या हातात मोठी तलवार होती. हा प्रसंग तोडफोड होण्याअगोदर कॅमेऱ्याने कैद केला आहे. तलवार हातात घेऊन रस्त्यावर येत तोडफोड करणारा कोण आहे ? त्याने ही तोडफोड का केली ? या प्रश्नांचा छडा पोलीस प्रशासनाने लावावा. अशी मागणी आय.एम. काजी यांनी पोलीस विभागाला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!