अंबाजोगाई

आधार क्रमांक मोबाइल क्रमांक ला लिंक करण्यासाठी पोस्टाची विशेष मोहीम

अंबाजोगाई:  सध्या शहरी व ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांच्या आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक नाही त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या अडचणी दुर करण्यासाठी आधार क्रमांक मोबाइल क्रमांक ला लिंक करण्यासाठी अंबाजोगाई पोस्टात २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पोस्टाची विशेष मोहीम राबवीण्यात येत आहे.

पिएम किसान योजनेसाठी अर्ज करणे पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स काढणे, इ श्रम कार्ड काढणे, विध्यार्थ्यांना स्कॉलरशिप अर्ज करणे इत्यादी. केंद्र /राज्य सरकारच्या योजनेसाठी इ केवायसी असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आधार मोबाइल लिंक असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेता बीड डाक विभाग अंतर्गत अंबाजोगाई उप डाक विभाग मार्फत दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी आधार कार्ड ला मोबाइल क्रमांक लिंक करण्यासाठी विशेष मोहीम अंबाजोगाई सब पोस्ट ऑफिस, शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई येथे आयोजित केलेले आहे. दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी अंबाजोगाई पोस्ट ऑफिस कार्यालयात संपर्क साधावा तसेच आपले आधार कार्ड व मोबाइल क्रमांक लिंक करून घ्यावे . ह्याचे शुल्क फक्त ५० रुपये आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज भरण्याची आवशक्यता नाही व कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देण्याची आवशक्यता नाही. या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवहान करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!