अंबाजोगाई

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये कॅम्पस मुलाखतीत २४ विद्यार्थ्यांची निवड

अंबाजोगाई: येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल व अहमदनगर येथील एक्साइड, कायनेटिक व सुपा एम.आय.डी.सी. मिंडा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॅम्पस मुलाखतीमध्ये २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

उद्घाटनप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्घाटक म्हणून संबोधित करताना सांगितले की, आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण नोकरीकरिता धडपडत आहे. महाविद्यालयामध्ये आयटीआय, डिप्लोमा, बीएससी, बी.ई. या पात्रताधारक विद्यार्थ्यांसाठी एक्साइड, कायनेटिक व सुपा एमआयडीसी मिंडा या कंपन्यांनी विविध पदांसाठीच्या कॅम्पस मुलाखती आयोजित करून विद्यार्थ्यांना आपल्या दारातच नोकरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे असे त्यांनी सांगीतले.
यावेळी परिसर मुलाखतीसाठी कंपनीमार्फत विभागीय व्यवस्थापक पुणे येथून विशाल साळुंखे, अहमदनगर शाखा व्यवस्थापक सचिन पंडित, सुपरवायझर रविंद्र नवले, अविनाश गायकवाड यांनी मुलाखती यशस्वीरित्या संपन्न केल्या. या मुलाखतीत निवड झालेल्या एकूण २४ विद्यार्थ्यापैकी १३ मुले व ११ मुलीना महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!