अंबाजोगाई

कोदरी येथे एक हेक्टर ऊस जळून खाक

अंबाजोगाई: विजेच्या तारांची ठिणगी पडल्याने 1 हेक्टर 19 आर तोडणीस आलेला ऊस जळून खाक झाल्याचे घटना सोमवारी तालुक्यातील मौजे कोदरी येथे घडली.

शेतकरी महेश ज्ञानोबा भगत यांच्या शेतातून वीज तार गेली आहे. सोमवारी तारांचे घर्षण होऊन 1 हेक्टर 19 आर ऊस जळून खाक झाला. आगीने उग्र रूप धारण केले असता अग्निशमन दलाची गाडी बोलावून आग नियंत्रणात आणण्यासाठी बिबिशन सुरवसे, रामेश्वर गुंड, नितीन शिंदे,माऊली भगत, वैभव घोगरे आदींनी प्रयत्न केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!