क्राईम डायरीगेवराई
घरासमोर लावलेली कार पळवली

गेवराई /प्रतिनिधी:
घरासमोर लावलेली कार (Car Stolen ) रात्री चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना शहरातील महेश कॉलनी मध्ये रविवारी ( दि. २७) घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील महेश नगर येथे राहणारे राम वैजीनाथ चौधरी यांनी रात्री आपल्या घरासमोर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर व्हीडीआय कार (एम. एच.12 एल. व्ही. 7972) लावली होती. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी कारचा काचा फोडून व गाडीचे लॉक तोडून साडेपाच लाख किमतीची कार चोरून नेली. याप्रकरणी राम वैजनाथ चौधरी यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.