बीड

अँटी करप्शन च्या अधिकाऱ्यावर गुन्हा

बीड /प्रतिनिधी
एसीबी मध्ये कार्यरत असताना सापळ्यात अडकलेल्या एका शाखा अभियंत्याला लाच मागितल्याच्या प्रकरणात बीड एस सी बी चा तत्कालीन पोलिस निरीक्षक असलेल्या राजकुमार पाडावी याच्यासह त्याचा तत्कालीन रायटर च्या विरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत आहे. बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सध्या सुरू आहे. एसीबीच्या कार्यालयाने केलेल्या चौकशीत लाच मागितल्याचे समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल केला जात आहे.

बीड एसीबीने एप्रिलमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या शाखा अभियंत्याला एका हजाराची लाच घेताना पकडले होते. या प्रकरणात आरोपी शाखा अभियंता शेख समद नूर मोहम्मद यांला मदत करण्यासाठी एसीबीचा तत्कालीन पीआय राजकुमार पाडवी यांने दोन लाखाची लाच मागितली आणि त्यानंतर त्याच्या रायटर प्रदीप वीर याने 50 हजारात डिलफिक्स केल्याची तक्रार एसीबीच्या महासंचालक कार्यालयाकडे करण्यात आली होती. जमीलोद्दीन शेख यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीवर एसीबीच्या कार्यालयाने चौकशी केली या चौकशीत मागणी केल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्यानंतर सोमवार रात्री एसीबी औरंगाबाद चे पथक बीड शहरात दाखल झाले. या पथकाने राजकुमार पाडावी आणि प्रदीप वीर यांच्या विरोधातील तक्रार बीड शहर पोलिसाकडे दिले असून शहर पोलिसात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!