बेकायदेशीर बियाणे विक्री; आष्टीत एका जणावर गुन्हा

आष्टी /प्रतिनिधी
येथील जि. प. च्या कृषी विभागाने तालुक्यातील धामणगावातील एका जणाविरोधात शनिवारी बेकायदेशीर बियाणे विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
तालुक्यातील धामणगावात येथे बापूसाहेब महाजन यांचे समृद्धी कृषी सेवा केंद्र नावाने खते व बियाणांचे दुकान आहे. ५ जून रोजी पं.स.चे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक नितीन राऊत हे धामणगावात कृषी केंद्र तपासणीसाठी गेले होते. यावेळी महाजनांकडे बियाणे, खते विक्रीचा परवानाच नसल्याचे समोर आले होते. शिवाय, साठा रजिस्टर, भालफलक, साठाफलक, पावती पुस्तक, बियाणे विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी यापैकी एकही रेकाॅर्ड त्यांच्याकडे नव्हते. याबाबत राऊत यांनी त्यांना नोटीस बजावत ९ जूनपर्यत खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र कृषी विभागाकडे दिलेल्या मुदतीत खुलासा सादर केला नाही. शनिवारी कृषी अधिकारी राऊत यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावरून बापूसाहेब महाजन विरोधात बियाणे विक्री अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद केला.
येथील जि. प. च्या कृषी विभागाने तालुक्यातील धामणगावातील एका जणाविरोधात शनिवारी बेकायदेशीर बियाणे विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.