मृत्यूस कारणीभूत ठरल्याने एकावर गुन्हा दाखल

माजलगाव/प्रतिनिधी:
मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने मोटरसायकल चालकावर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात शनीवारी (ता. 12 ) गुन्हा दाखल झाला आहे.
सिरसदेवी ता. गेवराई येथे राहणारे अमोल विष्णू सुगडे व माजलगाव येथे राहणारे राजाभाऊ गोवर्धन पवार हे दोघे मोटरसायकलवरून माजलगाव येथे येते होते. मोटारसायकल (एम. एच. 44 एक्स 5591) तालखेडजवळ आली असता रस्त्यावर असलेला गतिरोधक मोटारसायकल चालक अमोल सुगडे यांना दिसला नाही. यामुळे गाडी गतिरोधकावर जोरात आदळून स्लीप झाली व दोघेही गाडीवरून खाली पडले. पाठीमागे बसलेले राजाभाऊ पवार यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अमोल सुगडे यांनी आपली मोटरसायकल भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून पाठीमागे बसलेले राजाभाऊ यांना गाडीवरून खाली पाडले व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. याप्रकरणी राजाभाऊ यांचा मुलगा कैलास राजाभाऊ पवार याच्या फिर्यादीवरून अमोल विष्णू सुगडे ( रा. सिरसदेवी ता. गेवराई) याच्यावर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राठोड करीत आहेत.
![]() | ReplyForward |