क्राईम डायरीबीड

पोलिस पाटलाच्या खून प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

बीड/प्रतिनिधी:
तालुक्यातील मानकुरवाडी चे पोलीस पाटील भीमराव ससाणे ( वय 59 रा. ढेकणमोहा ता. बीड) यांच्या डोक्यात खोरे मारून खून करण्यात आल्याची घटना गुरूवारी रात्री घडली होती. याप्रकरणी गावातील एक व्यक्ती आणि त्याच्या दोन मुलावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भीमराव ससाणे यांचा मुलगा संतोषने दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी रात्री आठ तीस वाजता गावातील रवी मुरलीधर शिंदे हा त्यांच्या घरासमोर आला आणि भाऊ कृष्णा ससाणे त्याला बोलावून सोबत घेऊन गेला. थोड्यावेळाने ते दोघे परतल्यानंतर कृष्णाच्या बोटाला जखम दिसून आल्याने संतोष च्या गचूरीला धरून त्याबाबत जाब विचारला. याचा राग आल्याने तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देत शिवीगाळ करून रवी तिथून निघून गेला. त्यानंतर संतोष ला बीडच्या रूग्णालयात पाठवून संतोष आणि भीमराव हे घरासमोर थांबले. तेवढ्यात आठ पंचेचाळीस वाजता च्या सुमारास रवि मुरलीधर शिंदे, त्याचा भाउ दीपक मुरलीधर शिंदे व त्याचे वडील मुरलीधर लिंबाजी शिंदे हे दिघे खोरे काठ्या घेऊन तिथे आले आणि त्यांनी संतोष व भिमराव यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी डोक्यात खोरे मारल्याने भीमराव जागीच कोसळले तरी देखील त्यांनी काठीने मारहाण सुरूच ठेवली. भांडण सोडविण्यासाठी आलेले भीमराव यांची पत्नी सुशीला यांनाही मारहाण करण्यात आली. तेवढ्यात इतर ग्रामस्थ आल्याने हल्लेखोर पळून गेले. यावेळी रुग्णवाहिका बोलावली असता त्यातील डॉक्टर यांनी भीमराव यांना तपासून मयत झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून भीमराव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. सदर फिर्यादीवरून रवी मुरलीधर शिंदे, भाऊ दीपक मुरलीधर शिंदे आणि मुरलीधर लिंबाजी शिंदे यांच्यावर पिंपळनेर पोलिस ठाण्यात कलम 302, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आ

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!